पथराड तांड्यात 11 वर्षीय मुलाची गळफास

0

भडगाव । तालुक्यातील पथराड तांडा येथील 11 वर्षीय मुलांने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पथराड तांडा येथील विजय कैलास चव्हाण (वय-11) या अल्पवयीन मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडना घडली. मात्र ही आत्महत्या आहे हत्या हे अजून समजू शकले नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेचा उलगडा भडगाव पोलिसांकडून लवकरच होणार असल्याचे समजते.