पथारीवाल्यांच्या भाडेदरात 50 टक्के सवलतीचा निर्णय

0

पुणे : पथारी व्यावसायिकांना भाडेदर 50 टक्के कमी करणे आणि त्याच सवलतीच्या दराने थकबाकी वसूल करणे हे निर्णय महापिलिकेने घेतले आहेत अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. यापुढे विधवा, परित्यक्ता यांना पथारी परवाना प्राधान्याने देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यापुढे पथारी व्यावसायिकांना 300चा दर 150 रुपये, 200चा दर 100 रुपये याप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. गटई व्यावसायिकांसाठी पाच रुपये भाडेदर प्रतिदिन आकारण्यात येणार आहे.

पथारीवाल्यांकडे 64 कोटीची थकबाकी आहे. जुन्या दराने ती वसूल होणे शक्य नसल्याने सवलतीचे दर लागू केले आहेत असे स्पष्टीकरण महापौर टिळक यांनी दिले. पथारी व्यवसायिक समन्वय समितीची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात हे निर्णय घेण्यात आले.

नगरसेवकांसाठी अ‍ॅप

प्रभागातील विकासकामे, अंदाजपत्रक तरतूद आणि निविदा याची माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात यावे असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रशासनाकडून अर्धवट माहिती मिळत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या त्यावर तोडगा काढण्यासाठी अ‍ॅप विकसित करण्याचे ठरविण्यात आले.