पदग्रहण सोहळा

0

बारामती । येथील लायन्स क्लब ऑफ बारामतीच्या 2017-18 या वर्षातील नवीन कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक के्रडाईचे उपाध्यक्ष सुरेंद्र भोईटे, राजेंद्र यादव यांची सचिव पदासाठी तर क्रेडाईचे महाराष्ट्राचे सहसचिव प्रफुल्ल तावरे यांची खजिनदारपदी निवड झाली आहे.

या सर्वांनी यावेळी पदभार स्विकारला. कार्यक्रमास लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल कुशावर्त जाचक, लायन्स डिस्ट्रिक्ट युथ एक्सचेंजचे धैर्यशील भोसले, मिलिंद शहा आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुरेंद्र भोईटे यांनी मावळते अध्यक्ष पंकज गादिया यांच्या हस्ते स्विकारला. यावेळी भोईटे यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.