पदपथांवर पालिकेची ब्लिचिंग पावडरची फवारणी

0

नेरुळ । सिवूड्स येथील पदपथांवर पावसाळ्यात शेवाळे साठलेले आहे. त्यामुळे येथे नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सदस्य व शिवसेना शाखाप्रमुख समीर बागवान यांनी पालिकेकडे या पदपथांवर ब्लिचिंग पावडर फवारणी करण्याची मागणी केली होती. याची तातडीने दखल घेऊन सिवूड्समधील सर्व पदपथांवर फवारणी करण्यात आली आहे.

या पदपथांवर पावसामुळे शेवाळे साचून निसरडेपणा आला होता.या शेवाळामुळे पाय घसरून नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत समीर बागवान यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाले होत्या. बागवान यांनी तातडीने पालिकेला पत्र लिहून याबाबत उपययोजन करण्याची मागणी केली होती. अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेने सिवूड्समधील सर्व पदपथांवर ब्लिचिंग पावडरची फवारणी केली आहे. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.