मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहे. शनिवारी २३ रोजी अजित पवारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदाची फडणवीसांनी शपथ घेतले. त्यानंतर आज २५ रोजी मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिली सही केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या धनादेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. १ लाख २० हजाराचा हा धनादेश मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दिलेला हा पहिलाच धनादेश आणि मदतनिधी आहे.
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहे. मात्र अद्याप त्यांना बहुमत सिद्ध करावयाचे असल्याने त्यांच्यावर विश्वासदर्शक ठरावाची टांगती तलवार आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेले आहे, याबाबत कोर्टाने संपूर्ण सुनावणी केली असून उद्या १०.३० वाजेपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे. यावर आता उद्याच निर्णय होईल.