पदाधिकांर्‍यांच्या सहभागाशिवाय पहिल्यांदाच शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या

0

पुणेः पुणे जिल्हा परिषदेतील बहुप्रतिक्षित ऑनलाइन शिक्षक भरतीला मंगळवारी प्रारंभ झाला. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच पदाधिकार्‍यांच्या सहभागाशिवाय ऑनलाइन भरती प्रक्रिया झाली. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या 319 शिक्षकांची ऑनलाइन पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरती करण्यात आल्या. आणखी 94 शिक्षणसेवकांची भरती प्रक्रिया 27 जुलैला राबविली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण 413 शिक्षक जिल्ह्यातील शाळांना उपलब्ध होणार आहेत.

ऑनलाइन शिक्षक भरतीमध्ये 512 शिक्षण सेवकांची भरती करण्यात येणार होती. त्यांपैकी 318 जागा जिल्ह्याबाहेरून आलेल्या शिक्षकांच्या होत्या. ऑनलाइन शिक्षक भरती प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या कऱण्यात आल्या आहेत. 319 जागांपैकी आदिवासी भागात 15 शिक्षकांची नियुक्ती कऱण्यात आली. तसेच अवघड भागात 55 तर सोप्या भागात 249 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

सर्व शिक्षकांना समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही शिक्षकांच्या तक्रारी नव्हत्या. एका दिवसात 319 शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने भरती करण्यात आली. सर्व शिक्षकांच्या भरती सुरळीत झाल्या आहेत. त्यामुळे 94 शिक्षणसेवकांची पदे 27 जुलैला भरण्यात येतील. हवेली तालुक्यात सर्वाधिक 49 तर त्यापाठोपाठ खेड तालुक्यात 45 शिक्षकांची भरती करण्यात आली. शिरुरमध्ये 43, मुळशीमध्ये 34, दौंड तालुक्यात 33 ठिकाणी जागा भरण्यात आल्या आहेत. वेल्हा आणि बारामती तालुक्यात सर्वाधिक कमी शिक्षक भरती कऱण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.