पदार्पणातच पृथ्वी शॉचे शतक; नावावर केला विक्रम

0

राजकोट- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा कसोटी सामना आज सुरु आहे. भारताच्या पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक पूर्ण करून नवा विक्रम नावावर केला. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात त्याने 99 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि पदार्पणात शतक करणारा तो चौथा युवा फलंदाज ठरला. 18 वर्षे 329 दिवसांच्या पृथ्वीने राजकोट कसोटीत विंडीज गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

बांगलादेशचा मोहम्मद अश्रफुल ( 17 वर्ष व 61 दिवस), झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मासाकाड्जा ( 17 वर्ष व 352 दिवस) आणि पाकिस्तानचा सलीम मलिक ( 18 वर्ष व 323 दिवस) हे पदार्पणात शतक झळकावणारे युवा फलंदाज आहेत.