मुंबई : शैक्षणिक कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने जे पी नाईक भवन ,कलिना येथे पदोन्नोती मधला आरक्षण मिळावे यासाठी विद्यापीठातील सर्व मागासवर्गीय समाजातील कर्मचारी,अधिकारी,प्राध्यापक वर्ग एकत्र ऐवून पदोन्नोती मधला आरक्षणासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडवी या विषयावर बैठक घेण्यात आली होती.कर्मचारी संघटना व मुफ्ता प्राध्यापकांची संघटनेच्या माध्यमातून सरकार निवेदन देण्यात येणार असल्याचे एस टी मोरे यांनी सांगितले.या बैठकित संस्थेचे अध्यक्ष एस टी मोरे,सरचिटणीस सुनील हाटे,प्रा.संदेश वाघ,दिपक मोरे, हेमंत गांर्गेुडे,अविनाश तांबे,संजय बागले, संजय पवार, धरती मेश्राम, प्रकाश वाटोरे,मंगेश कांबळे, भीमराव डोळस,विनोद जाधव,भीमराव पवार आदि कर्मचारी,अधिकारी वर्ग मोठ्यासंख्येने या चर्चासत्रात सहभागी झाले होते.