पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ नेते शंकर कमटम यांचे निधन

0

भिवंडी । भिवंडी शहर परिसरातील पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ नेते आणि भिवंडी नगरपालिकेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष शंकर आशय्या कमटम यांचे हृदयविकाराने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रामुख्याने कापड निर्मिती उद्योगात पद्मशाली समाजाचे मोठे योगदान आहे.

अखिल पद्मशाली समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षेे पद्मशाली समाजातील गोरगरीब लोकांची सेवा करण्यात त्यांनी सर्वाधिक वेळ दिला होता. भारतीय जनता पार्टी पक्षवाढीसाठी शंकर कमटम अथक प्रयत्न केले होते. नगरसेवक ते उपनगराध्यक्ष या कालावधीत भिवंडीतील रहिवाशांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या अकाली निधनाने पद्मशाली समाज आणि भिवंडीकरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.