अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता

0

जळगाव । जिल्हा पोलीस दल व उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचा सांगता समारोह तसेच आरएसपी विद्यार्थी परेड संचलन व सिग्नल पीटीचे व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परेड संचलनाचे निरीक्षण अपर पोलीस अधिक्षक डॉ. मोक्षदा पाटील यांनी केले. या परडचे कमांडर म्हणून आर. आर. शाळेची खुशी अहिरे ही होती. यावेळी परेड संचलनात व सिग्नल पीटी व सास्कृतिक कार्यक्रम विजेत्या विद्यार्थी व शाळांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. 20 शाळांमधील 1200 विद्यार्थी व विद्यार्थींनी सहभाग नोंदविला.

उत्कृष्ट परेड संचलनात श्रीराम माध्यमिक प्रथम
रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप व बक्षिस वितरणात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम, पोलीस अधिक्षक डॉ. जालींदर सुपेकर, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, उप विभागीय पोलीस अधिक्षक सचिन सांगळे उपस्थित होते. उत्कृष्ट परेड संचलनाकरीता प्रथम श्रीराम माध्यमिक विद्यालय, द्वितीय व तृतीय क्रमांक आर. आर. विद्यालय, उत्तजनार्थ सेंट जोसेफ कॉनव्हेट स्कूलला देण्यात आला.

या प्रतिष्ठानांचा सक्रीय सहभाग
रस्ता सुरक्षा अभियान यशस्वीकरण्यासाठी शहरातील पीपल्स बँक, पीपीआरएल, गणपती हॉस्पीटल, जैन इरिगेशन, सुप्रीम इंड्रस्ट्रीज, रेमंड प्रा. लि., त्रिमुर्ती इंजीनियरिंग कॉलेज, सातपुडा ऑटोमोबाईल, फोकस हुंडाई, राम होंडा, रवी रोडवेज, दुध विकास, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, एलएच पाटील स्कुल, मुक्ती फाऊंडेशन, एस3 कलेक्शन आदींना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

यांनी पाहिले कामकाज
यशस्वीतेसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहा. मोटर वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, सदाशिव वाघ, अतुल पवार, अतुल भागवत तसेच शहर वाहतुक शाखेचे सपोनि प्रदिप देशमुख, सतिष जोशी, भरत पाटील, विलास पाटील, सुनिल पाटील, अशोक महाजन, किरण चौधरीख ट्रॉफीक वॉर्डन बॉईज सचिन घुगे यांनी कामकाज पाहिले.