जळगाव । रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सहकारमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. सदिच्छा भेटीत झालेल्या 1 तासाच्या चर्चेत निरुपनांतून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्रावणाला कसे अनन्य साधारण महत्त्व आहे हे पटवून दिले. राज्याच्या विकासासाठी जबाबदारी व कर्तव्याची जाणीव करुन दिली. वृक्ष संवर्धन व शेतकरी हिताबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियान, वृक्ष संवर्धन, समाज प्रबोधन, अंधश्रध्दा, याबाबतही पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांच्या समवेत रायगड जिल्ह्याचे डी.डी.आर. पी.एम. खोडका, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, विशषे कार्यकारी अश्विनीकुमार पोतदार, पी.सी.पाटील आदी उपस्थित होते.
नुकताच केंद्र शासनाचा प्रतिष्ठेचा व सन्मानाचा समजला जाणार्या पद्मश्री पुस्काराने तीर्थस्वरुप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा शाल व श्रीफळ देवून सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सत्कार केला. तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांचा ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तर पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे शाल, श्रीफळ देवून स्वागत केले.डी.डी.आर. पी.एम. खोडका, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील, विशेष कार्यधिकारी अश्विनीकुमार पोतदार, मोतीलाल पाटील, पी.सी. पाटील, भरत सरगंर, धर्मेद्र कुंभार आदि उपस्थित होते.