पद्मालया इंग्लीश स्कुलमध्ये पर्यावरण पुरक गणेश मुर्ती कार्यशाळा     

0

जळगाव : शिरसोली येथील पदमालया इंग्लीश मेडिअम स्कुल मध्ये मूर्तीकार मयुर गायकवाड खुबचंद सागरमल विद्यालयाचे विदयार्थी ज्ञानेश्वर कोळी ,निखिल शिदे यांनी विद्यार्थ्यांना शाडु माती पासुन गणेश मुर्ती तयार करण्याचे प्रात्याशीक दिले. यात १७५ विदयार्थी सहभागी झाले. यावेळी मुख्याध्यापीका स्वाती चौधरी,संस्थाचालक विलास बारी,उल्का फाऊडेशनचे भूषण वले ,हरित सेनेचे प्रविण पाटील यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव कसा साजरा करावा या बाबत मार्गदर्शन केले.यशस्वीतेसाठी प्रतिभा शिवरामे,स्वाती बारी गायत्री सुर्वे,मनिष पाटील,संदिप तायडे यांनी सहकार्य केले.