पद्मालय तिर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळविण्यासाठी होतोय पाठपुरावा

0

जळगाव । जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय हे तिर्थक्षेत्र आहे. या तिर्थक्षेत्राला ’ब’ दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी देखील ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे पद्मालय तिर्थ क्षेत्राला ’ब’ दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे. मागणीचा प्रस्ताव त्यांनी मंत्र्यांना पाठविले आहे. पालकमंत्री हे 2 जून रोजी जिल्ह्या दौर्‍यावर असून त्यांच्याकडे ही मागणी केली जाणार आहे. या अगोदर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांनी देखील ’ब’ दर्जा मिळावा यासाठी पाठपुरवठा केला आहे. जर भविष्यात पद्मालय तिर्थक्षेत्राला ’ब’ दर्जा मिळाला तर विद्यमान अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष यांच्यात श्रेयावरुन वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कारण विद्यमान अध्यक्षा पाटील ह्या भाजपाच्या आहेत तर माजी उपाध्यक्ष आमले हे शिवसेनेचे आहेत.