पद्मालय येथील अंगणवाडीस राज्यस्तरीय पुरस्कार

0

एरंडोल । तालुक्यातील पद्मालय येथील अंगणवाडीस सर्वोत्कृष्ट परसबाग फुलविल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सुरेखा पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कर देऊन गौरविण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा व जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याचा मान पद्मालयाच्या सुसंगती अंगणवाडीस मिळाला. तसेच श्रीमती पाटील यांना रिलायन्स फौंडेशनने ब्रांड अम्बेसिटर म्हणुन निवड केली. राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन रिलायन्स फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जून 2016 रोजी परसबाग तयार करण्याचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा घेण्यात आली होती.

खडकाळ जमिनीत फुलविली बाग
कार्यशाळेनुसार अंगणवाडी सेविका सुरेखा पाटील यांनी खडकाळ जमिनीवर माती व शेणखत टाकून परसबाग फुलवून आपल्या परसबागेतील भाजीपाल्याची उत्तम बाग फुलवून आपल्या अंगणवाडीस पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला अंगणवाडीसह पद्मालय येथील जी.प.च्या प्राथमिक शाळेला सुद्धा पुरवून उरलेला भाजीपाला परिसरातील लोकांना विकला व विशेष म्हणजे विकलेल्या भाजीपाल्याच्या पैशातून आपल्या अंगणवाडीतील मुलांसाठी खर्च केला. परसबागेत भाजीपाल्यासह फळबाग, फुलांची झाडे लावून राज्यात एक नवीन आदर्श घडविण्याचे काम सुरेखा पाटील यांनी केला आहे. सदर परसबाग फुलविण्यासाठी सुनील दुसाने, विलासराव भाटकर व मुखासेविका लता पाटील, ग्रामसेवक रमेश पवार, े सरपंच परवीन शेख, भारती सोनवणे, भगवान सोनवणे, उत्तम मोरे, चंदा मोरे यांनी परीश्रम घेतले.