दोंडाईचा । चित्तोंड ची महाराणी हिंदू सती ‘पद्मावती’ यांचा इतिहास त्याग, समर्पण, बलिदान, पावित्र्य आदीचा आहे. तर संजय लिला भंसाली यांनी काढलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटात इतिहासाची मोड-तोड करण्यात येवुन विद्रुप रूप दाखविण्यात आल्याचा आरोप शिंदखेडा तालुक्यातील क्षत्रीय समाजाने केला आहे. भारतभर सिनेमा प्रदर्शित करण्यात येवु नये यासाठी दि.23 रोजी शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथील महिला व ग्रामस्थाकडून तापी नदी पात्रात शेकडोंच्या संख्येने ’जलआंदोलन’ करण्यात येणार आहे.
अपर तहसिलदार, पोलिस निरीक्षकांना निवेदन
यासाठी तालुक्यातील राजपूत समाज संघटनासह विविध हिंदु संघटनांच्या वतीने अप्पर तहसिलदार व पोलीस निरीक्षक दोंडाईचा यांना निवेदन देण्यात आले. संपुर्ण जुने कोळदे येथील महिला, ग्रामस्थ व तालुक्यातील समाज बांधव व हिंदु संघटनांचे पदाधिकारी दि. 23 जानेवारी रोजी तापी नदी पात्रात ’जलआंदोलन’ करणार आहेत असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदनावर राकेश राजपूत, रामसिंग राजपूत, योगेश राजपूत, सागर राजपूत, धिरज राजपूत, निलेश राजपूत, महेंद्रसिंग राजपूत, ईश्वरसिंग राजपूत, नयन राजपूत,जयदेव राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकत्यांच्या स्वाक्षर्या आहेत.