भुसावळात राजपूत समाजाच्या बैठकीत निर्णय
भुसावळ– पदमावत सिमेमात राजपूत समाजाचा चुकीचा इतिहास दाखविल्याच्या निषेधार्थ जळगाव येथे 19 रोजी महामार्चा काढण्याचे ठरले. शहरातील माळी भवनात बुधवारी राजपूत समाजाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 19 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ येथील नाहाटा कॉलेजजवळ राजपूत समाजातील व मित्र मंडळीनी एकत्र यावे व मोर्चा हा शांततेत व संयमाने काढावा, असे आवाहन समाधान महाजन यांनी केले. रेवसिंग पाटील यांनी राणी पद्मावती यांचा खरा इतिहासाबाबत माहिती दिली.