पद्मावतीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

0

चेंडू पुन्हा सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पद्मावती चित्रपटाबाबत सुनावणीस नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सेन्सॉर बोर्डाने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करू शकत नाही. तसे केल्यास हा प्री-जजमेंटचा प्रकार ठरेल. सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट देताना कायदेशीररित्या काम करते, चित्रपटाबाबतही तेच निर्णय घेतील. न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप कसा करणार? असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

संजय लीला भंसाळींच्या पद्मावती चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहेत. आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात चित्रपट रिलीज करणार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी वकील एमएल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, चित्रपटातून वादग्रस्त दृश्य हटवण्याची मागणी केली आहे. तसेच निर्माता दिग्दर्शकांच्या विरोधात एफआयआर दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.