पद्मावती’चे पहिले ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाले, तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंहला कल्पना करणेही जरा जड जात होते. त्याची शरीरयष्टी, नजर आणि आतापर्यंतच्या हिरोच्या भूमिका लक्षात राहिल्यामुळे रणवीरच्या फॅनला रणवीरला व्हिलनच्या रोलमध्ये बघणे जरा जडच जात होते. या रोलसाठी तो दुसर्या क्रमांकाची निवड होता.
अगोदर या रोलसाठी अजय देवगणला निश्चित केले गेले होते. एका मासिकाने हा दावा प्रॉडक्शन हाऊसमधील सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. मात्र, संजय लीला भन्साळींच्या ऑफिसने मात्र हा दावा नाकारला आहे. ही गोष्ट पीआर’वाल्यांनी पसरवली आहे. अजय देवगणला खिलजीचा रोल कधी ऑफर केला गेला नव्हता. पहिल्यापासून या रोलसाठी रणवीर सिंहचीच निवड निश्चित होती. संजय लीला भन्साळींच्याच बाजीराव मस्तानीमध्ये थोरल्या बाजीरावाच्या रोलसाठी अजय देवगणला विचारण्यात आले होते. हे मात्र खरे आहे. मात्र, त्यावेळी काही समीकरण चुकले आणि अजय देवगण हा बाजीराव झाला नाही. अल्लाउद्दीन खिलजी काय किंवा बाजीराव काय दोन्ही रोलमध्ये रणवीर सिंह फिट्ट बसला. पण पद्मावतीबाबतचा वाद संपून तो रिलीज झाला तर प्रेक्षकांना अनुभवता येऊ शकेल.