‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध झाल्यानंतर एक फसवा तर्क जोरकसपणे मांडला जातो, तो म्हणजे ‘विरोधकांनी पहिला चित्रपट पाहावा आणि नंतर विरोध करावा.’ वरकरणी पाहता हा मुद्दा योग्य वाटतोे, पण ते तसे नाही. या विधानामागे केवळ आणि केवळ पैशांचेच गणितच आहे. तिकीट काढून चित्रपट पाहायला गेल्यावर त्याचे पैसे चित्रपटाच्या टीमला मिळतात तसेच प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या विरोधाचीही म्हणावीशी दखल घेतली जात नाही आणि आर्थिक हानी न झाल्याने दिग्दर्शक आणि निर्माते अजून उन्मत्त होतात.
साधारण महिन्या-दीड महिन्यांपूर्वी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाला हिंदुत्वनिष्ठ संघटना, इतिहासप्रेमी मंडळी यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. पद्मावती चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण केल्याच्या कारणावरून देशभर हा विषय हाताळला गेला. परिणामस्वरूप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची नामुष्की दिग्दर्शकावर ओढवली. त्यानंतर केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळासह इतिहास तज्ज्ञांच्या एका समितीला हा चित्रपट दाखवण्याचे ठरवण्यात आले. मात्र, 30 डिसेंबरला केवळ काही जणांना हा चित्रपट दाखवला गेला. या वेळी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटात काही पालट सुचवले. वरवर सुचवण्यात आलेले ते पालट केले, तर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात काही जणांनी त्यांना प्रदर्शनापूर्वी चित्रपट दाखवण्याचे आश्वासन देऊनही नंतर वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे. मेवाडच्या राजपरिवाराचे सदस्य विश्वराज सिंह यांनीही पद्मावती चित्रपटाच्या परीक्षणाच्या समितीतून त्यांना गाळल्याचा आरोप करून केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाच्या कारभारावर टीका केली. या प्रकारावरून पद्मावती चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची दर्शवलेली सिद्धता ‘मॅनेज्ड’ आहे का, अशी शंका येते.
वरवरचे बदल पद्मावती चित्रपटाला झालेल्या विरोधामागे इतिहासाचे विकृतीकरण हा मुख्य आक्षेप होता. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने जे पालट सुचवले, त्यावरून विरोधामागचे कारण आणि सूचना यांचा ताळमेळ घालता येत नाही. पद्मावती चित्रपटाचे नाव पालटावे (पद्मावत करावे), चित्रपटाच्या आधी ‘डिस्क्लेमर’ दाखवावा अशा काही सूचना समितीने केल्याचे समजते. याशिवाय समितीने म्हणे 26 कट्स सुचवले आहेत (त्यामध्ये घूमर डान्सचाही समावेश असल्याचे वृत्त आहे) मात्र, या सूचनांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह आणि अनैतिहासिक दृश्ये बदलली गेली आहेत, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या वेळीही संजय लीला भन्साळी यांनी डिस्क्लेमर दाखवून विरोधकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला होता. केवळ ‘सदर चित्रपट काल्पनिक आहे’, असा डिस्क्लेमर दाखवला म्हणजे चित्रपटातील व्यक्तिरेखा, कथानक, प्रसंग, वातावरण असे ऐतिहासिक वातावरण काल्पनिक थोडेच होते? प्रेक्षक चित्रपट लक्षात ठेवतात की चित्रपटाच्या प्रारंभीची सूचना? डिस्क्लेमरच्या नावाखाली इतिहासाशी झालेली प्रतारणा कशी सहन केली जाईल? तसेच पद्मावतीऐवजी पद्मावत असे नाव ठेवल्याने असा काय मोठा लाभ होणार आहे? हिंदुत्वनिष्ठांचा चित्रपटाच्या नावाला विरोध नव्हता, तर चित्रपटात अभिव्यक्तीच्या नावाखाली इतिहासाच्या केल्या जाणार्या मोडतोडीला होता. त्याविषयीची स्पष्टता परिनिरीक्षण मंडळांनी केलेल्या सूचनांमुळे येत नाही. त्यामुळेच जोपर्यंत शंकासमाधान होत नाही, तोपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी चित्रपटाला असलेला विरोध कायम ठेवला आहे. तो म्हणजे ‘विरोधकांनी पहिला चित्रपट पाहावा आणि नंतर विरोध करावा.’ वरकरणी पाहता हा मुद्दा योग्य वाटतोे, पण ते तसे नाही. या विधानामागे केवळ आणि केवळ पैशांचेच गणितच आहे.
तिकीट काढून चित्रपट पाहायला गेल्यावर त्याचे पैसे चित्रपटाच्या टीमला मिळतात तसेच प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या विरोधाचीही म्हणावीशी दखल घेतली जात नाही आणि आर्थिक हानी न झाल्याने दिग्दर्शक आणि निर्माते अजून उन्मत्त होतात. हिंदुत्वनिष्ठांची फसवणूक होत असल्याने चित्रपटाविरोधात पुन्हा आंदोलने चालू होण्याची चिन्हे आहेत, अशी आंदोलने होऊ नयेत आणि चित्रपट डागाळला जाऊ नये, असे वाटत असेल, तर चित्रपट, नाटके, मालिका, विज्ञापने, पुस्तके आदी माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक आहे. लोकांच्या धार्मिक अन् ऐतिहासिक श्रद्धांशी आणि श्रद्धास्थानांशी खेळणार्यांना हिसका बसू शकेल. हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणार्या बाजीराव पेशवेंची प्रतिमा बाजीराव-मस्तानी चित्रपटात केवळ प्रेमवीर म्हणून रंगवणारे, राजपूत कन्या जोधा यांचे अकबराशी प्रेमसंबंध होते, असा धादांत खोटा इतिहास जोधा अकबर चित्रपटातून मांडणारे भन्साळी पद्मावती चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते नव्हते, असे दाखवणार नाहीत, याची शाश्वती देता येत नाही. देशात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असताना हिंदुत्वनिष्ठांना एवढा लढा उभा राहावा लागत आहे आणि त्यामध्येही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न होत आहेे. सरकारच्या भरवशावर न राहता हिंदुत्व, धर्म, इतिहास, संस्कृती यांना विरोध करणार्या, धर्मभावनांची खिल्ली उडवणार्यांच्या आर्थिक नाड्या आवळणे, त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालणे हाच जनतेकडे प्रभावी उपाय उपलब्ध आहे. संघटनामध्ये शक्ती असल्याने चित्रपटातील इतिहासाच्या विकृतीकरणाच्या रोगावर या बहिष्काराचा उपाय लागू होईल, यात शंका नाही.
– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387