नंदुरबार । वादाच्या भोवर्यात अडकलेल्या पद्मावती चित्रपटाच्या विरोधाची धार दिवसेंदिवस अधिकच तेज होत आहे. दरम्यान सोमवारी 20 रोजी राजपूत समाजाच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक संजय भन्साळी यांचे पोस्टर्स जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जाळून निषेध व्यक्त केला. क्षत्रिय राणा राजपूत समाज ट्रस्टच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. चित्रपटात राणी पद्मावती यांच्या व्यक्तिरेखा बाबत मूळ इतिहासाला बगल देत आक्षेपार्ह चित्रण व विधाने घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संजय भन्साळी यांनी केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली असून चित्रपट प्रदर्शित झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यांच्या स्वाक्षर्या
निवेदनावर अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, कार्याध्यक्ष विलासभाई राजपूत, उपाध्यक्ष दिनेश राजपूत, सचिव भिमसिंग राजपूत, खजिनदार हेमंत राजपूत,अविनाश राजपूत,गजेंद्रसिंग राजपूत, जितेंद्रसिंग राजपूत राजपूत, मनोज राजपूत, मोहितसिंग राजपूत, वामन राजपूत, दीपक राजपूत, वाल्मिक राजपूत, देवेंद्र राजपूत, चेतन राजपूत, सुदर्शन राजपूत, प्रतापसिंग राजपूत, बलराज राजपूत, प्रल्हाद राजपूत, देवीसिंग राजपूत , जितेंद्र राजपूत , कांतीलाल राजपूत , हेमंत राजपूत, दीपक राजपूत, योगेश राजपूत, नितीन राजपूत, भास्कर राजपूत, गोविंदा राजपूत, रोहन राजपूत, योगेश राजपूत, रितेश राजपूत, सुभाष राजपूत आदींच्या स्वाक्षर्या आहेत..
ट्विटरवर इशारा
पद्मावती हिंदुत्वाचा दिव्य ज्योत आहेत. त्यांच्याबद्दल चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवून बदनामी खपवून घेणार नाही. असा इशारा पदाधिकारी गजेंद्रसिंग राजपूत यांनी चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांना ट्विटरवरून दिला आहे. संतप्त झालेल्या बालकाने दिग्दर्शकाचे छायाचित्र असलेल्या पोस्टरवर लघुशंका करीत निषेध नोंदविला तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी ’राणी पद्मावती जिंदाबाद ’, संजय भन्साळी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
राजपुतांची अस्मिता
राणी माता पद्मावती राजपुतांचा दैवत व अस्मिता आहेत. प्रसिद्धी व पैशांच्या लालसेपोटी दिग्दर्शक भन्साळी याने चित्रपटात राजपुतांच्या चुकीचा इतिहास दाखविलेला आहे. त्यामुळे समाजाची बदनामी झालेली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल.
– जितेंद्रसिंग राजपूत
(जिल्हाध्यक्ष – अ.भा. क्षत्रिय महासभा)