नवी दिल्ली: कॉंग्रेसमध्ये फेरबदल व्हावे अशी मागणी केल्या काही दिवसांपासून होऊ लागली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष गांधी घराण्याव्यतिरिक्त असावा अशीही मागणी होत आहे. काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम व जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर देत पक्षाचे अध्यक्ष पद सोडायला आपण तयार असून, एकत्र येऊन नवीन नावाची निवड करा असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता उद्या २४ ऑगस्टला होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यासह २३ नेत्यांनी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिले आहे.