पनवेल : रविवारी पहाटे पाचच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळ भोकरपाड़ा येथे वाशीहून औरंगाबादकडे 20 हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे पेट्रोल नाल्यात सांडून आगीचा भडका उडाला व टँकरने पेट घेतला. टँकरचालकासह पांच जण त्यात जखमी झाले.