पनवेल । महागडी औषधे? त्यावर लागणारा टॅक्स शिवाय त्यावर जीएसटीचा भडीमार. हे इंत्यभूत सामान्य जनतेसाठी आवाक्याबाहेरचे आहे. या सर्वांमुळे कित्येकदा रुग्णांना औषधांअभावी जीवनास मुकावे लागत आहे. पण आता या सर्वातून सुटका होणार आहे.
पनवेलमध्ये 30 ते 70 टक्के स्वस्त दरात लवकरच औषधे उपलब्ध होणार असून सर्वसामान्य नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. पनवेलमधील तक्का परिसरात हे जेनेरिक स्टोअर चालू होणार असून तापापासून ते कॅन्सरपर्यंत सर्व औषधे या स्टोअर मध्ये मिळतील, तसेच सर्वसामान्य व्यक्तिला या औषधाबध्दल पडणारे प्रश्न? तसेच ही जेनेरिक औषधे कोणत्या कंपनीची असतात? या विषयी सर्व माहीती आपणांस मिळू शकेल, ही औषधी खरेदी करण्यासाठी रूग्णांस संबंधीत औषधी नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.