भुसावळ : पनवेल-गोरखपूर दरम्यान धावणार्या विशेष ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. डाऊन 05066 विशेष गाडी 10 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान पनवेल येथून दर सोमवारी, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी 3.50 वाजता सुटल्यानंतर गोरखपूरला तिसर्या दिवशी रात्री 12.20 वाजता पोहोचणार आहे. डाऊन दिशेला या गाडीला नाशिक रोड, भुसावळ व खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 05065 विशेष गाडी 9 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान गोरखपूर येथून दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व रविवारी 5.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी पनवेलला 2.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ व नाशिक रोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.