पनवेल शेतकरी कामगार पक्षाचा ७० वा वर्धापन दिन उत्साहात

0

पनवेल | पनवेल महानगर पालिका क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाचा ७० वा वर्धापन दिन पनवेलच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह करण्यात आला होता. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य बाळाराम पाटिल आणि पनवेल महानगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि पक्षाची नवीन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.

या वर्धापन दिन सोहळ्याला माजी आमदार विवेक पाटील, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, माजी नगरध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य काशीनाथ पाटील, कृषि उत्पन बाजार समिति सभापती उपस्थित होते.