पन्नाशी गाठलेल्यांची शिक्षकांची सुट्टी…

0

पाटणा- बिहारमधील कमी निकाल लागणाऱ्या शाळांमधील पन्नाशी गाठलेल्या शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती देऊन त्यांना कायमची सुट्टी देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. एक महिन्याच्या आत ही कार्यवाही होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सक्तीची सेवानिवृत्ती देण्यासाठी ५० शिक्षकांची यादी तयार आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, शिक्षण मंत्री के. पी. वर्मा, मुख्य सचिव अंजनी कुमार सिंह या बैठकीत सहभागी झाले होते. सरकारच्या अनेक निर्णयांमुळे राज्याच्या शिक्षणव्यवस्थेला चांगलाच धक्का मिळालेला आहे.

शिक्षणविभागाची कारवाई अशी आहे……

बिहारमध्ये इंटर परीक्षेत शून्य टक्के निकाल लागलेल्या २५० आहे. शिक्षण विभागाने नुकताच अशा सुमार शाळांचा आढावा घेतला.

शिक्षकांबरोबरच शिक्षण खात्याच्या सुस्त अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. त्यांची यादीही तयार करण्यात येत आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेत तीन वेळा नापास होणाऱ्या शिक्षकांनाही सेवामुक्त केले जाणार आहे.

पाच टक्के निकाल लागणाऱ्या शाळांकडेही सरकारची करडी नजर आहे. पण तुर्तास शून्य टक्के निकालाकडे सरकारचे लक्ष आहे.