परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलेचा प्रवेश !

0

तुळजापूर- केरळमधील शबरीमाला मंदिराप्रमाणेच परंपरा मोडीत काढत तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात एका महिलेने प्रवेश करत देवीचे चरणस्पर्श करून पूजा केली. राज्याची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नव्हते, मात्र, तुळजापूर शहरातीलच काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे.

मंजुषा मगर असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी देवीच्या गर्भगृहात जाऊन देवीची पूजा करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली. या संदर्भात काही महिला जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटल्या होत्या.