वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांना गूढ असे रेडीओ लहरींचे संदेश पृथ्वीपासून ११ प्रकाश वर्षे दूर असलेल्या अंतराळातील एका ताऱ्यावरून प्राप्त होत आहेत. त्यामुळे परग्रहावर जीवसृष्टी असू शकेल ही शक्यता तपासून पहाण्यासाठी शास्त्रज्ञांना आणखी एक आशेचा किरण मिळाला आहे.
रॉस १२८ नावाचा एक लाल खुजा तारा आहे. सुर्यापेक्षा २८०० पट कमी प्रखर असा तो तारा आहे. त्याच्याशी निगडित कोणते ग्रह आहेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुएर्तो रीको विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञांनी एका प्रभावी दुर्बिणीद्वारे ताऱ्यावरून आलेले संदेश टिपले. पृथ्वीबाहेर असणाऱ्या सजीवांकडून हे संदेश येत असले पाहिजेत, असे एबेल मेंडेझचे मत आहे. त्याच्या मते संदेश ताऱ्याकडूनच आले असे सांगता येणार नाही पण त्या दिशेनेच आले. इतक्या लांबून एखाद्या कृत्रिम उपग्रहावरून आलेले हे सिग्नल आहे. असेही खगोलशास्त्रज्ञांना वाटते.