जळगाव : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी युवकांना अनेक संधी उपलब्ध असून त्याचा मोठा प्रमाणात महाविदयालयीन तरूणांनी लाभ घ्यावा असे मत पुणे येथील वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉ.कैवल्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा महाविदयालयातर्फे 24 डिसेंबर रोजी युवकांना परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी होते. डॉ. कैवल्य कुलकर्णी यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यात कसल्याच प्रकारच्या अडचणी राहिल्या नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यास कसल्याच अडचणी राहिल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणासाठी जातांना कुठलीही भिती न बाळगू नये असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
विदेशात शिक्षणाने आत्मविश्वास
बाहेर देशात शिक्षण घेतल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात चालून येतात. उत्तम भविष्यासाठी यासंधीचा आपण लाभ घेतला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. परेदशात उच्च शिक्षण घेण्याची अनेकांना इच्छा असते मात्र काही मुलभूत प्रश्नामुळे विदयार्थी हिंम्मत करत नाही. या अडचणीमध्ये आर्थिक बाब महत्वाची आहे. मात्र आता देशात शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणारे बँका उपलबध आहेत. त्याच बरोबर काही संस्था देखील मदत करतात.
इच्छाशक्ती असल्यास उज्वल भविष्य
परदेशातही उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे विद्यापीठ आहेत. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. परदेशात शिक्षण घेतांना राहणे, प्रवास, जेवण, मार्गदर्शक अशी कुठलीच अडचण आता शिल्लक नाही. यासर्व बाबींसाठी ऑनलाईन बुकिंग करता येते. त्यामुळे इच्छा असूनही अडचणीमुळे परदेशात जावू न शकणार्या विदयार्थ्यांसाठी मार्ग उपलब्ध झाले आहेत. हे मार्ग निवडणे गरजेचे आहे. आपल्यातील इच्छाशक्ती भक्कम असेल तर परदेशातही आपण उज्वल भविष्य घडवू शकतो असेही ते शेवटी म्हणाले.
विद्यार्थ्यांचे प्रश्नोत्तरातून शंका निरासन
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी विदयार्थ्यांना परेदशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. महाविद्यालय होतकरू विदयार्थ्यांसाठी प्रयत्नशील असून आवश्यक ती सर्व मदत करायला तत्पर असल्याचेही यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञानशाखेचे समन्वयक डॉ.जे.एन.चैधरी यांनी केले. याप्रसंगी विदयार्थ्यांनी प्रश्नोत्तरातून आपल्या शंकाचे निरासन केले.