नवी दिल्ली । आर्थिक घोटाळे करून परदेशात पळून जाणार्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी केंद्र सरकारने ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयका’ला गुरुवारी मंजुरी दिली. आता देशाबाहेरील संपत्ती संबंधित देशाच्या सहकार्याने जप्त करण्यात येऊ शकते, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. आर्थिक घोटाळे करून कारवाई टाळण्यासाठी परदेशात पळून जाणार्या विजय मल्ल्या, नीरव मोदी यांसारख्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी या विधेयकाची बर्याच काळापासून मागणी होत होती.