मुक्ताईनगर : हतनूर धरण परीसरातील तापी व पुर्णा नदी क्षेत्रात गेल्या दोन वर्षापासुन परप्रांतीय मच्छीमारांनी धुमाकूळ घातल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय मजदूर संघ अंतर्गत येणार्या स्थानिक मच्छीमारांनी तहसील कार्यालयाबाहेर गुरुवारपासून साखळी उपोषण छेडले आहे.
साखळी उपोषणास बसलेले मासेमार हे हतनूर धरण परीसरातील विस्थापित व पारंपरीरक मच्छीमार आहेत. त्यावरच त्यांची उपजिविका चालते. गेल्या दोन वर्षापासुन परप्रांतीय मच्छीमारांनी तापी पुर्णा पात्रात मासे-मारीसाठी धुमाकूळ घातला आहे. ते स्थानिक मच्छीमारांचे जाळे ओढुन त्यातील मासे काढुन नेतात व जाळेदेखील तोडुन टाकतात. परप्रांतीय मासेमारांना तत्काळ हतनूर जलाशय पात्रातुन हटविण्यात यावे या मागणीसाठी भारतीय मजदुर संघ अंतर्गत स्थानिक मासेमार साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत