वॉशिंग्टन | मनात सेल्फीची लहर येते आणि आपणच आपल्याला कॅप्चुअर करण्यासाठी हात हळूहळू लांबवतो. हे खूपच रटाळ आहे. त्यापेक्षा मिंडी स्टीकी काय सांगते ते पाहू या. मिनी ट्रायपॉड घ्या त्यावर स्मार्टफोन फिक्स करा किंवा सेल्फ टायमर एप डाऊनलोड करा आणि कॅमेऱ्यासमोर उभे रहा. कशाला हात लांब करून पसरट बनता, असा मिंडीचा सल्ला आहे.
आपण कसं दिसतो हे आपल्याला आपण कसं दिसतो यावर अवलंबून असतं, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. कुणाला तरी आपण फोटो काढायला सांगतो. डिजिटल कॅमेऱ्याने तो बरेच फोटो काढतो. त्यातील फोटो निवडतो चांगले वाटतील ते निवडतो. पुढे एडिटिंग करतो आणि कमी आकर्षक आणि जास्त आकर्षक असे निकष लाऊन आपल्यापुढे योग्य कि अयोग्य फोटो येऊन पडतात. लोकांना खरेखुरे फोटो ओरिजिनल फोटो ओळखताच येत नाहीत, मिंडी म्हणते. डिजिटल तंत्रज्ञानाने बदललेले फोटो आपण जास्त आकर्षक दिसण्यासाठी तयार केले जातात. लोकांना हे समजत नाही.
सेल्फीत आपण अनेक फोटो क्लिक करतो. एकदा, दोनदा, तिनदा……आणि अचानक आपल्याला समजतं की आता ओके आपण आहोत तसे आलोय फोटोत. तिथेच आपला आपल्याला आपल्याच स्वरूपात खरं खुरं पहाण्याचा शोध संपतो.