परभणीत उंटाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

0

परभणी : उरुसानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत उंटाने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समीर इनामदार (१५ ) असे मृत मुलाचे नाव आहे.

परभणी येथे उरुसानिमित्त संदल मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत उंटांचा समावेश होता. हा संदल शहरातील जनता मार्केटमध्ये आला असताना समीर इनामदारने त्यातील एका उंटाची दोरी ओढली.अनेक वेळा दोरी खेचल्याने उंट बिथरला आणि थेट समीरचा गळा धरला. मिरवणुकीत सहभागी असलेल्या इतर भाविकांनी उंटाच्या तावडीतून समीरची सुटका करून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नानल पेठ पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.