परमात्म्याकडे जाण्यासाठी स्वःत:च पायी चालत गेले पाहिजे

0

धानोरा । धानोरा ते पेरणापीठ (गुजरात) पदयात्रेची सुरूवात आज सकाळी धानोरा गावा पासुन झाली. 4 मार्च ते 18 मार्चेपर्यंत ही पदयात्रा आहे. परमात्याकडे स्वःत ह पायी चालत गेले पाहिजे, ही श्रध्दा अंगी बाळगून धानोर्‍यासह इतर गावातून आलेल्या पदयात्रींनी व्यक्त केली. या पदयात्रेत सर्वसमाजातील लोक सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन होत असते. परम पुज्य महामंडेलेश्‍वर 1008 श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज ( फैजपुर संस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली या पदयात्रेची सुरुवात सन 2009 पासुन करण्यात आलेली आहे. सुरुवातीला यांनी ही पदयात्रा सुरत ते पेरणापीठ अशी पाच वर्ष सुरु केली होती. या पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे तप मानले जाते.

काय आहे पेरणापीठ?: कलीयुग व अथर्व वेदाच्या ज्ञानावर भाष्य केले आहे असे सतपंथाचे प्रवर्तक इमामशाह महारांजाची समाधी आहे. त्यांनी अध्यात्म ज्ञानयोग वि6ेद्वारे सतपंभाचा प्रचार आणि प्रसार केला, त्यांचा जन्म काळ 1204ते 1302 असा आहे. मुळ मुलतान (सध्याचे पश्‍चिम पाकीस्तान) यांनी 61 व्या वर्षी समाधी घेतली. त्यांना सुफी संत म्हणुन ओळखले जाते. त्यांनी त्या वेळेस सांगितलेली आगाम वाणीही ही सद्द स्थितीस खरी होत चालली आहे. गुढीपाडवा (चैत्र शुद्ध) या सणाच्या दिवशी हया पदयात्रेची पुर्णाहुती होत असते. या ठिकाणी सर्व सतपंथी एकत्र जमतात. तेथिल गादीपती जगतगुरुनानक दासजी महाराज हे संबोधन करतात, त्यात उपासना मार्ग, कळस, पुजा, ज्योत, वारी, यज्ञ, सत पंथाच्या शंभर क्रियांचे ज्ञान देऊन माहीती दिली जाते. व्यसनमुक्ती, उपसना भक्ती, इमामशहा महाराजांचे संपुर्ण ज्ञान भजनातुन सांगितले जाते.

श्रध्देने हे सर्व सतपंथी भक्त चालत जातात. निष्कलंकी नारायणाचा नाम घोष करतात, सत्ससंगाचा लाभ घेतात, व सतपंथी परंपरेचा, जीवनशैलीचा अंगीकार करुण सत्येचा प्रचार आणी प्रसार करतात, अशी प्रतिक्रिया महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज यांनी सांगितले. पदयात्रेत दररोज महाआरती, प्रभातीपुजा, इमाम शहा महाराजांचा सत्संग होत असून या पदयात्रेत फैजपुर, धानोरा, चोपडा, जांभोरा, शेंदुर्णी, शिरपुर, शहादा, तळोदा, कुकर मुंडा, डेडीयापाडा, राजपिपला येथील भाविकांचा समावेश आहे.

महिला पुरूषांसह अबालवृद्धांचा सहभाग
या वर्षी जाणार्‍या पदयात्रेची संख्या जास्त प्रमाणात आहे , जवळ जवळ 200च्यावर स्त्रीया, पुरुष, तरुण, तरूणी, अबालवृध्द या सर्वांचाच समावेश आहे. ही पदयात्रा 16 दिवसाची आहे. महामंडलेश्‍वर 1008 श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज, शास्त्री भक्ति किशोरजी महाराज सर्वसमन्वय मुखी महाराज फैजपुर संस्थानचे उपाध्याक्ष माणिकचंद महाजन, विजय मुखी,धनराज मुखी, मनोहरमुखी, आनंदामुखी, तसेच सतपंथ ज्योत मंदिर धानोरा, फैजपुर संस्थानचे सर्व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते.