परवडणार्‍या दरातील घरांसाठी मुंबईतील रेडिरेकनरला स्थगिती

0

मुंबई । मुंबईत परवडणार्‍या दरातील घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीचे भाव वाढून परवडणार्‍या घरांच्या किमती आणखी वाढू नये यासाठी मुंबईतील जमिनीच्या रेडिरेकनर दराला एक महिन्याची स्थगिती दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

जीएसटी विधेयकावरील चर्चेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिल्यानंतर राइट टू रिप्लायखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मिरची, हळद, इमली, धने या वस्तूंना करमाफी देणार का? आणि राज्यातील घरांच्या खरेदी-विक्रीत घट झाल्याने राज्य सरकारच्या महसुलात घट झाल्याने रेडिरेकनरचा वाढीव दर रद्द आणला आहे का? अशी विचारणा सरकारला केली. त्यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहून बसून विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला बसूनच स्पष्ट करत या प्रश्‍नाचे उत्तर मी देतो म्हणून स्वत: उभे राहिले. त्यानुसार मुंबईत जमिनीच्या किमती या जरी रेडिरेकनरच्या दरानुसार बाजारात वाढत असतात. मुंबईत परवडणार्‍या घरांच्या निर्माणासाठी जमिनीची मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे. त्यामुळे सध्या असलेल्या जमिनींच्या किमती आणखी वाढू नये यासाठी सध्या वाढवण्यात आलेल्या रेडिरेकनरच्या किमतीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा निर्णय फक्त मुंबईतील जमिनीसाठी घेतला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी मुंबईतील घरांच्या किमतीत फारशी वाढ होणार नसल्याने मुंबईकरांना एक महिन्यासाठी का होईना घर घेणार्‍या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.