परवानाधारक व्यापार्‍यांना केळी द्यावी

0

रावेर कृषी बाजार समितीचे शेतकर्‍यांना आवाहन

रावेर- कृषी उपन्न बाजार समितीकडून ज्यांनी परवाना घेतला असेल अश्याच व्यापा-यांना शेतक-यांनी आपली केळी द्यावी. तालुक्यात अनेक व्यापारी परवाना नसतांना केळी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहे.यामूळे तालुक्यात बिना परवाना कुणी व्यापारी केळी खरेदी करत असेल तर त्यांची तक्रार कृषी उपन्न बाजार समितीकडे करण्याचे आवाहन सभापती निळकंठ चौधरी यांनी केले आहे. रावेर तालुक्यात बोर्डापेक्षा निम्मे भावाने केळी खरेदी सुरु आहे या समस्ये बाबत रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने सभागृहात शेतकर्‍यांची बैठक घेतली .या बैठकीत अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन महिन्यापासुन शेतकर्‍यांची पिळवणुक सुरू आहे.तोल काटयावर केळीचा ट्रक मोजतांना एक बिल बाजार समितीला दयावे . कारवाईसाठी भरारी पथकाला शेतकरी मदत न करता व्यापार्‍याची पाठराखण करीत असल्याने कारवाई करण्यास अडचण निर्माण होते. दिल्लीवरून केळी घेणारे व्यापारी ट्रकनेच केळी घेत असल्याने रेल्वे वॅगन बंद असल्याचे सांगण्यात आले.

पोषण आहारात केळीचा समावेश करावा
महाराष्ट्रात शासनाने शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा. बाहेर देशात टिश्यूची रोपे पाठविणार्‍या आणि स्थानिक शेतकर्‍यांना रोपे न देणार्‍या कंपनीवर कारवाई करावी. अश्या अनेक महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निळकंठ चौधरी ,संचालक डॉ.राजेंद्र पाटील , डॉ. सुभाष पाटील , पितांबर पाटील, प्रमोद धनके, गोपाळ नेमाडे , सोपान पाटील , गोपाळ बोरोले , गोपाळ पाटील , गंगाराम राणे , अशोक वाणी , ताराचंद पाटील , चंद्रकांत पाटील , विनोद पाटील , विलास ताठे, महेंद्र पाटील यासह शेतकरी उपस्थित होते . सुत्रसंचलन बाजार समिती सचिव गोपाळ पाटील व आभार डॉ. राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले .

व्यापा-यांचीही लवकरच बैठक
बैठकीत शेतक-यांच्या भावना जाणून घेतल्या नंतर लवकरच बाजार समिति व्यापा-यांची बैठक आयोजित करणार आहे. त्यांना बोर्डावरील भावा प्रमाणे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येईल तर विना परवानाधारक व्यापारी यापुढे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच या बाबत लवकरच केंद्रीय कृषी मंत्री, मुख्यमंत्री यांची संचालक मंडळ् भेट घेणार असुन या केळी भाव संदर्भातील काही घटना दुरुस्ती करण्याची मागणी बाजार समिती करणार आहे.