परवाना देणाऱ्या कार्यालयालाच स्वच्छतेच्या परवाण्याची गरज

0

नवी मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत असणारा व दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल वसूल करून देणारा नवी मुंबइ येथील कार्यालय एक कोंडावडा बनला आहे. तिथे जायचे म्हणजे विविध अडचणींचा सामना करून जावे लागत आहे.जर हे कार्यालय शासनाला दरवर्षी चांगल्या प्रकारे महसूल प्राप्त केऊन देत असेल तर ह्या कार्यालयाची अवस्था अशी का आहे असा सवाल व्यावसायिक विचारात आहेत.त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी व नागरिकांना सोयीस्कर पडेल अश्या ठिकाणी हलवा अशी मागणी होत आहे.

कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी दुकान निरीक्षक कार्यालयाकडून गुमास्ता परवाना प्राप्त करावा लागतो त्याच वेळी कोणताही व्यवसाय सुरु करता येतो.सध्या तर छोट्या मोठ्या वाहनांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असेल आणि वाहने विकत घ्यायची असतील तर प्रथम गुमास्त परवाना अत्यावश्यक केला गेला आहे.जसे सध्या कोणतेही सरकारी कामकाज करायचे असेल आधार कार्ड महत्वाचा केला आहे.त्याचा प्रकारे गुमास्ता परवान्याचे महत्त्व आहे.त्यामुळे दुकान निरीक्षक कार्यालयाचे महत्व फार वाढले आहे. सध्या नवी मुंबईतील दुकान निरीक्षक कार्यालय ए.पी.एम.सी.बाजार मध्ये आहे.या कार्यालय अंतर्गत एक लाखाच्या आसपास व्यावसायिकांनी गुमास्ता परवाना घेतले आहेत.

परवाना काढताना सध्या एका वर्ष्या साठी एका कामगार साठी ३१० रुपये असा दर आहे.तसेच एकही कामगार नसेल तर परवाना घेताना कमीत कमी अधिकृतपणे एक हजार रुपये मोजून परवाना घेता येतो.त्यामुळे दरवर्षी कोट्यावधीचा महसूल शासनाला प्राप्त होत आहे.परंतु शासनाचा अपेक्षित असा लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. सध्या हे कार्यालय ए.पी.एम.सी.बाजारात एका इमारती मध्ये पहिल्या माळ्यावर आहे.दोनशे चौरस फुटाच्या जागा हि या कार्यालयाला नाही.तसेच जिना चढताना अंधाराचा सामना येथे आलेल्या नागरिकाला करावा लागत आहे.नागरिकांनी गुठका व पानांनी जिन्याच्या भिंती रंगवल्या आहेत.तसेच येथील वातावरण कोंदट आसे आहे.या इमारती माध्ये चढतानाच कार्यालय कसे असेल याची जाणीव नागरिकांना येते.यामुळे नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.तसेच कार्यालय हि अरुंद असल्यामुळे नागरिकांना बसताही येत नाही.तसेच कर्मचारी वर्गालाही बसण्यास जागा अपूर्ण पडत आहे.यामुळे कर्मचाऱ्यां मध्ये सुद्धा नाराजी आहे. हे कार्यालय अश्या ठिकाणी आहे .त्या ठिकाणी बसेस फार कमी आहेत.बेस्ट व एन.एम.एम.टी.च्या किरकोळ बस वगळता येथे दुसरी कोणतीही बस दिसत नाही.त्याही बसेस फार कमी आहेत.त्यामुळे नागरिकांना रिक्षा भाड्याने केल्या शिवाय येथे जाता येत नाही.

त्यामुळे हे कार्यालय सोयीस्कर अश्या ठिकाणी न्यावा अशी मागणी सर्व स्थरातून होत आहे. या बाबत वाशी कार्यालयाचे मुख्य अधिकारी पुरी यांच्यासी संपर्क साधला असता,आम्ही कार्यालयीन समस्या विषयी वरिष्ठाशी पत्रव्यवहार केला असून त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत असे सांगितले.