मुंबई : नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने देशातील शहरी तसेच निमशहरी भागात मद्याचा महापूर येतो. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्याही रंगतात. पण यावर्षी 31 डिसेंबरला दारू परवाना न देण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतल्यामुळे मद्य नसल्याने मैफिली रंगने अवघड झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उत्पादन शुल्क विभाग काटेकोरपणे पालन करणार असल्याचे या विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने 31 डिसेंबर रोजी एक दिवसाचा मद्य परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय तळीरामांना आता रिचवावा लागणार असून महामार्ग सोडून इतर ठिकाणी सोय करावी लागणार आहे. थर्टी फस्टच्या रात्री तारांकित हॉटेलमध्ये मद्यासोबत अनेक रंगतदार कार्यक्रम होतात. मात्र आता महामार्गावर असणार्या तारांकित हॉटेलांना मद्य परवण्याशिवाय अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे कठीण झाले आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार मुंबईच्या पश्चिम उपनगरातील 2 मोठ्या पंचतारांकित हॉटेलांना याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे.