जळगाव- सिमी प्रकरणातील संशयित आरोपी असीफ खान बशीर खान (वय 44) आणि परवेज खान यांचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या न्यायालयात जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणी संशयीत परवेज याने स्वत:ची साक्ष द्यायची नसल्याचे सांगून साक्षीदार ही तपासायचे नसल्याचे सांगितले होते. मात्र बचावासाठी लेखी जबाब देणार असल्याचे न्यायालयात सांगितले होते. तो लेखी जबाब परवेज याने सोमवारी न्यायालयात सादर केला. त्यात त्याने फिर्यादीपक्षाने सादर केलेले पुरावे खोटे आहेत. तर अक्सा मशीदीचे शेख फारूख शेख अब्दुल्ला यांनी दिलेली साक्ष स्वत:ला वाचवण्यासाठी खोटी दिल्याचे म्हटले आहे. त्यांनी खोटे पुरावे सादर केले आहे. त्यांच्याकडे सिमी संघटनेच्या सभेसाठी लेखी अर्ज कधीही केलेला नाही. मात्र सिमी संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे लिहीले आहे. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर संशयितांतर्फे अॅड. सुनील चौधरी यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी 27 डिसेंबरपास ून युक्तिवादाला सुरूवात होणार आहे.