जळगाव । नशेचे पान खाऊ घालून बलात्कार केल्याप्रकरणी प्रकरणी संशयित पुत्र परवेज शेख व पिता रईस शेख यांचा अटकपूर्व जामीन व हाय कोर्टात जानेसाठीचा मुदत अर्ज फेटाळल्यानंतर शनिवारी रात्री जिल्हा पेठ पोलिसांनी परवेजला अटक करून आज रविवारी न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 6 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लग्नाचे अमिष दाखवुन पोलीस कॉन्सटेबल परवेज शेख याने युवतीवर ठिकठिकाणी नेऊन अत्याचार केला. तर फौजदार रईस शेख यानी अश्लील शब्द वापरून पिडीतेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून 21 जून रोजी दोघाविरूध्द जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पिता-पुत्रास 29 जूनपर्यंत तात्पुरता जामीन देण्यात आला होता. अटकपूर्व जामीनाची मुदत संपल्यानंतर पुन्हा या गुन्हयात जामीन मिळावा यासाठी पोलीस पितापुत्राने पुन्हा अर्ज सादर केले होते. तो अर्ज न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला होता. तर जिल्हा पेठ पोलिसांनी रात्री परवेज शेख याचा शोध घेवून त्याला अटक केली. रविवारी संशयित परवेज शेख याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आले. न्या. प्रतिभा पाटील यांनी युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर संशयित परवेज शेख याला 6 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.