परशूराम वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला देण्यास नकार

0

बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी गौरी लंकेश हत्याप्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी परशूराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र एसआयटीला देण्यास नकार दिला आहे. मात्र वाघमारेची कर्नाटकातच दोन तास चौकशी करण्याची परवानगी महाराष्ट्र एसआयटीला देण्यात आली आहे. परशूराम वाघमारे यांच्या चौकशीतून दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या प्रकरणाचे काही धागेदोरे हाती लागतात का हे या तपासातून पुढं येण्याची शक्यता आहे. मात्र केवळ दोन तासांत महाराष्ट्र एसआयटीला तपास करण्यात किती यश येणार हा खरा प्रश्न आहे.