परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकापर्ण व शुभारंभ
यावल प्रतिनिधी
तालुक्यातील परसाळे बुद्रुक येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मीनाताई राजू तडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध विकास कामांची लोकार्पण सोहळा व मान्यवरांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक १ जून २३ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला व सर्वपक्षीय पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती राहणार आहे .
परसाडे बुद्रुक,ता.यावल येथे १ जुन रोजी दुपारी ४ वाजता येथील प्रथम नागरीक महिला सरपंच मीनाताई राजू तडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून गावात जलजीवन मिशन अंतर्गत कुपनलिका भूमिपूजन तसेच पेसा अंतर्गत हायमस्ट लॅम्प लोकार्पण, १५ व्या वित्त आयोगातून सिमेंटचे २० बाक चौकात वितरित करून लोकार्पण, तसेच पेसा अंतर्गत ५००० लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टँकर लोकार्पण तसेच पालकमंत्री यांच्या निधीतून मंजूर झालेली २० लाखाची कब्रस्तान ( दफनभुमी ) जवळील नदीकाठी असलेली संरक्षण भिंत लोकार्पण अशा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमात यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती-उपसभापती व संचालकांचा यांचा यथोचित सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खा. रक्षाताई खडसे, भाजपाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिरालाल चौधरी ,अमोल हरिभाऊ जावळे तसेच प्रदेश संघटन मंत्री जनजाती मोर्चा किशोर काळकर, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे ,तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सभापती सदस्य,परिसरातील सरपंच उपसरपंच आणि विविध सहकारी सोसायटी यांचे चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे . यावेळी परसाडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे .