परसाळेच्या शेतकर्‍याचे केळी घड कापले : दोघांविरुद्ध गुन्हा

0

यावल- शेतातील केळी घड कापल्याप्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. परसाळे येथील रमेश सोना सावळे यांच्या तक्रारीनुसार मोहराळा शिवारात शेतगट क्रमांक 443 मधून संशयीत आरोपी मुबारक नबाब तडवी (रा.परसाडे) व त्या सोबत असलेल्या एका अज्ञात आरोपीने शंभराहून अधिक केळी खोड कापल्याने 25 हजारांचे नुकसान झालेे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी शेतकर्‍याचा मुलगा सतीष सावळे व बटाईदार नामदेव आत्माराम पाटील हे सायंकाळी केळीस व्हॉल्व्हव्दारे पाणी लावण्यास गेले असता शेतातुन निघून संशयीत दुचाकीद्वारे पसार झाले. यावल पोलिसात शनिवारी संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोेलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग सपकाळे करीत आहेत.