परस्पर गाळे खरेदी-विक्री करणार्‍यांवर कारवाई

0

जळगाव: फुले मार्केटमधील गाळेधारकांनी गाळे परस्पर खरेदी केल्याची घटना उघकीस आली आहे. या प्रकरणातील संबंधित गाळेधारकांसह तत्कालीन दुय्यम निबंधक व तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. मुळ गाळेधारकांनी ज्या गाळेधारकांना हस्तांतरीत करुन खरेदी-विक्री केली अशा सर्वांची चौकशी केली जाणार आहे. हस्तांतर करतांना महानगरपालिकेची परवानगी घेतली नाही. चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुटे यांनी दिली.