पराग शहा यांच्या वाहनावर प्रकाश मेहतांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला !

0

मुंबई: माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी घाटकोपर इस्टमधून भाजपने पराग शहा यांना उमेदवारी दिली आहे. आज पराग शहा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मात्र पराग शहा यांच्या उमेदवारीला प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी पराग शहा यांच्या वाहनावर हल्ला केला आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे.

प्रकाश मेहता यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.