पराभव झाला तरी पंकजा मुंडेंचे विधिमंडळात पुनर्वसन होईल: दानवे

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजप आणि महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. भाजपसाठी सर्वात धक्कादायक पराभव म्हणजे परळी मतदारसंघातील पंकजा मुंडे यांचा पराभव आहे. ग्रामविकास मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाला असला तरी त्यांना पुन्हा विधान परिषदेत घेतले जाईल अशी चर्चा आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी याबाबत भाष्य केले आहे. पंकजा मुंडे ह्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत, त्यामुळे त्यांचे राजकीय वजन मोठे आहे. विधानसभेत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे विधिमंडळात पुनर्वसन करण्याबाबत आमचे पक्ष सकारात्मक आहे. ते कसे करायचे याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.