शिमला । कांगारू कसोटी संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचा संघ भारताकडून पराभूत झाला.भारताने कांगारूना पराभूत करून 4 वर्षानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर वर्चस्व सिध्द केले. कांगारूचा संघाचा पराभूत कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स कर्णधार झाला आहे.यापुर्वी या संघाचा कर्णधार हा महेद्रसिंग धोनी होता.या कसोटी सामन्यात अनेक स्लेजिंग मुळे अनेक भारतीय खेळाडूवर कांगारूच्या खेळाडूंनी टिका केली होती.त्यामुळे आयपीएलमध्ये ते एकत्रित कसे खेळतील याबद्दल शंका आहे?
5 एप्रिलला सुरु होणार आयपीएल
कसोटी मालिकेत कांगारूच्या खेळाडून भारतीय खेळाडूंना लक्ष करित अनेक वेळा स्लेजिंग केली.यामुळे भारतीय खेळाडू दुखावले आहे.त्यातच आयपीएल 10ची सुरवात येत्या 5 एप्रिलला होणार आहे.त्यामुळे रायझिंग पुर्ण सुपरजायंटस संघाचा कर्णधार हा स्टीव्ह स्मिथ आहे.त्यामुळे आयपीएलमधील प्रदर्शनात संघा मागे राहू नये म्हणून अजिक्य रहाणेने बीअर पिण्यासाठी आमंत्रण दिले होते. स्मिथने रहाणेलाच नाही तर संपुर्ण संघाला बीअर पिण्याचे आमंत्रण दिले होते.स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये एकाच संघातून खेळतात. 5 एप्रिलपासून सुरु होणार्या आयपीएलआधी स्टीव्ह स्मिथला सर्व चुका सुधारायच्या आहेत.
स्मिथच्या ऑफरवर रहाणे म्हणाला
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चार कसोटी सामन्यांची मालिकेत अनेक कटू अनुभव आले. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. जेव्हा स्टीव्ह स्मिथने बीअर पिण्याची ऑफर दिल्यानंतर अजिंक्य रहाणेने उत्तर दिलं की, मी तुझ्याशी नंतर बोलेन. आयपीएलमधी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार स्मिथ म्हणाला की, आम्ही एकाच संघाचे सदस्य आहोत. पुढील आठवड्यापासून पुन्हा एकत्र असणार.