तळोदा । वाढते दलित अत्याचार, दलित विरोधी शासकीय धोरणे व विस्कळीत, भरकटलेल्या रिपब्लिकन चळवळीच्या पार्श्वभूमीवर दलितांचे मजबूत संघटन करुन आंबेडकरी चळवळीचा दबदबा निर्माण करण्यासाठी दलित कार्यकर्त्यांची एक बैठक तळोदयातील कनकेश्वर मंदिर परिसरात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. दलितांमधील स्वार्थी तथाकथित पुढार्यांच्या लाचारपणामुळे दलित चळवळीला अवकळा प्राप्त झाल्याबद्दल बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.
अध्यक्षपदी बिरारे, उपाध्यक्षपदी मोरे
दलितांनी निराश न होता परत एकदा चळवळीची बांधणी करुन मुकाबला करण्याचे आवाहन कॉ. प्रदीप मोरे, कॉ. नथ्थुभाऊ साळवे व राजेंद्र बिरारे यांनी केले. तसेच प्रदीर्घ विचार विनिमयानंतर फुले, शाहू, आंबेडकरी विचार प्रमाण मानणारी व कुणाच्याही हातचे बाहुले न बनणारी सामाजिक परिवर्तनवादी बहुउद्देशीय समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सदर कार्यकारिणीचा अध्यक्षपदी राजेंद्र बिरारे, उपाध्यक्षपदी कॉ. प्रदीप मोरे, सचिवपदी सिद्धार्थ महिरे, सहसचिवपदी प्रा. अशोक वाघ, कोषाध्यक्षपदी नथ्थू साळवे तसेच संघटक म्हणून शशिकांत सोनवणे, सुभाष शिंदे, अनिल पवार, सुरेश केदार, भिकलाल ढोढरे, दादाभाई पिंपळे, कन्हैया ढोढरे, भिमराव जावरे, पावबा ब्राह्मणे, कैलास चव्हाण, प्रल्हाद शिरसाठ, विठ्ठल बागले, तुंबा पिंपळे, प्रकाश बागले आदींचा समावेश करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणीची अभिनंदन केले आहे.