परिवर्तन अभिवाचन महोत्सवाचे आयोजन

0

जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन अभिवाचन महोत्सव २०१८ चे आयोजन मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.

दररोज सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. शहरात २०१५ पासून परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सव सुरु करण्यात आला आहे. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. दरवर्षी सात दिवसाचा असणारा हा महोत्सव यंदा आठ दिवसांचा होणार आहे. युवा वर्गात पुस्तकांची गोडी लागावी, त्यांची पुस्तकांशी मैत्री व्हावी, उत्तम पुस्तकं वाचायला यासाठी उत्तम अभिनेत्यांच्या सहाय्याने प्रकाश योजना, नैपथ्य, संगीत अशा दिग्दर्शकीय भूमिकांतून अभिवाचन सादर होत असते.

दि. २ सप्टेंबर रोजी पालखी ( दि.बा.मोकाशी), दि. ३ रोजी श्यामची आई, त्सुनामी (साने गुरुजी, टिली स्मिथ), दि. ४ रोजी डहाकेंच्या कविता (वसंत आबाजी डहाके), दि. ५ रोजी कुरुक्षेत्रानंतर (महाश्‍वेतादेवी), दि. ६ रोजी परिसंवाद : साहित्य वाचन संस्कृती व माध्यमे, दि.७ रोजी मतर्काच्या खुंटीवर ( जयंत पवार), दि. ८ रोजी आमचा पोपट वारला (चंद्रशेखर फणसळकर), दि. ९ रोजी वॉरेन हेस्टिंगचा सांड (उदय प्रकाश) आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.