जळगाव। अखिल भारतीय नाट्य परिषदेचा कै. विनय आपटे व भाई बोरकर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्थेचा पुरस्कार परिवर्तन जळगाव या संस्थेला जाहीर झाला आहे. मुंबई येथे 14 तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिवर्तनने नाटक,साहित्य, चित्रकला, नृत्य, संगीत, अभिवाचन, मुलाखती, काव्यवाचन, अपूर्णांक या नाटकाचे महाराष्ट्रभर केलेले 35 व्यावसायिक प्रयोग अशा विविध उपक्रमांमुळे खान्ंदेशामधील सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे.
वास्तवाचे भान ठेऊन वाटचाल
भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन, जळगाव पीपल्स को.-ऑप बँकेचे भालचंद्र पाटील, गुलाबराव देवकर इंजिनीयरिंग कॉलेज , रमेशदादा जैन, महावीर क्लासेस, आ. राजूमामा भोळे, रोटरी वेस्ट आदी संस्था व व्यक्ती यांची साथ असल्यामुळेच परिवर्तनला हा टप्पा गाठता आला . भालचंद्र नेमाडे, ना.धो महानोर, अशोकभाऊ जैन, विजय बाविस्कर, अनिल पाटकर, मोहन थत्ते याचे मार्गदर्शन लाभले आहे. जागतिकीकरणानंतर एकूणच बदललेले स्वरूप, क्षीण झालेली नाट्यचळवळ या सगळ्या परिणामांचा विचार करून परिवर्तन जळगावने आपला मार्ग ठरवला आहे.
टिम परिवर्तन
नारायण बाविस्कर, पुरूषोत्तम चौधरी, मंजुषा भिडे, हर्षल पाटील, मंगेश कुळकर्णी, संदिप केदार, होरिल राजपूत, अपर्णा भट, मोना तडवी, प्रतिक्षा जंगम, राहूल निंबाळकर, विजय जैन, योगेश चौधरी, नेहा महाजन, रजिता राजेर्शिके यासह अनेक कलावंत परिवर्तनचे काम पुढे नेत आहेत.